News Flash

शिवसेनेच्या चिंतन मेळाव्यात गटबाजीचे दर्शन

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात अपयश मिळाल्यानंतर मंगळवारी आयोजित केलेल्या शिवसेनेच्या चिंतन मेळाव्यात गटबाजीचे दर्शन घडले. जिल्हाप्रमुख संजय पवार व त्यांचे विरोधक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील

| May 22, 2014 04:52 am

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात अपयश मिळाल्यानंतर मंगळवारी आयोजित केलेल्या शिवसेनेच्या चिंतन मेळाव्यात गटबाजीचे दर्शन घडले. जिल्हाप्रमुख संजय पवार व त्यांचे विरोधक आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील गटबाजी पुन्हा एकदा बठकीत उफाळून आली. यावेळी प्रा. संजय मंडलिक यांच्या सक्षमतेबाबत आरोप करणाऱ्यांची शहर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून तपासणी व्हावी अशी मागणी संजय पवार यांनी केली.
निवडणुका होण्यापूर्वीच शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही असे सांगणाऱ्या व शिवसेना पक्षासाठी दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या जिल्हाप्रमुखांचे पद काढून घ्यावे असे म्हणणाऱ्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांवर आरोप करणाऱ्यांनी स्वतच चिंतन करणे गरजेचे आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी टीकास्त्र सोडले. तसेच लोकसभेचा वचपा विधानसभेत काढणे गरजेचे असून सहा आमदार निवडून आणण्यासाठी शिवसनिकांनी आत्तापासून कामाला लागावे, असे आवाहन पवार यांनी शाहू स्मारक येथील चिंतन बठकीत केले.
प्रा. संजय मंडलिक यांच्या पराभवाची कारणे शोधणे गरजेचे असून, लोकसभेत प्रचारासाठी कोणी किती आश्वासन दिले, किती पाळली, आपापल्या भागात किती मताधिक्क्य़ मिळवून दिले याचे आत्मचिंतन करावे. मोदींच्या लाटेमुळे व वाढत्या महागाईला काँग्रेसचे धोरण जबाबदार असल्यामुळे प्रा. मंडलिक निवडून येतील अशी दाट शक्यता होती. मात्र हे स्वप्न अपुरे राहिले. आपण व विजय देवणे यांनी गल्लोगल्ली, प्रभाग, शहर, तालुके प्रचाराने िपजून काढले आहेत. एवढे करूनही निष्ठावंतांवर आरोप होत असतील तर त्यांना अद्दल घडविणे गरजेचे आहे. मतदान होण्यापूर्वीच लोकसभेचा उमेदवार सक्षम नाही असे बोलून मतदारावर परिणाम करणाऱ्यांचा काय उपयोग आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. करवीरमधून संजय पवार व आपल्यामध्ये समन्वय आहे हे सर्वानाच माहीत असल्याचे सांगत विजय देवणे म्हणाले, चंदगडमधून १९ हजार, करवीरमधून ३४ हजाराचे मताधिक्कय़ मिळवून दिले आहे. मात्र दक्षिणमधून कमी मताधिक्य मिळाले, याला जबाबदार कोण याचे चिंतनही कमी मताधिक्य मिळवून देणाऱ्यांनी करावे असे म्हणत त्यांनी क्षीरसागर यांच्याकडे बोट दाखविले. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, अरुणा टिपुगडे, विनायक साळुखे यांनीही मते मांडली. यावेळी शुभांगी साळुंखे, सुषमा चव्हाण, हर्षल सुर्वे यासह शिवसेनेचे कार्यकत्रे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:52 am

Web Title: grouping in shivsena rally in kolhapur
टॅग : Election,Kolhapur,Rally
Next Stories
1 जि. प. च्या ९ अभियंत्यांविरुद्ध अफरातफरीप्रकरणी गुन्हा
2 जि. प. च्या ९ अभियंत्यांविरुद्ध अफरातफरीप्रकरणी गुन्हा
3 फलक फाडल्यावरून तासगावमध्ये तणाव