29 November 2020

News Flash

“ऑक्‍टोबर हिट’ नव्हे पाऊस; पुढील दोन दिवसात मुसळधार

दसऱ्याला पाउस बरसणार

(संग्रहित छायाचित्र)

ऑक्टोबर म्हटलं की उन्हाचा चटका हे समिकरण डोक्यात बसलं आहे. पण यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दसऱ्याला पाऊस बरसण्याची शक्यता आहे.  पंधरा दिवसांहून आधिक काळ रखडलेला मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास तीन दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण देशातून तो माघारी जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मोसमी वाऱ्यांचे देशात आगमन होऊन आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे वेळांच्या नियोजनानुसार आतापर्यंत मोसमी वारे देशातून माघारी फिरणे अपेक्षित होते. मात्र, कमी दाबाच्या पट्यांमुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे.

अंदाज काय?
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, २५ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. २६ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 8:22 am

Web Title: heavy rains next two days nck 90
Next Stories
1 उपाहारगृहे आजपासून रात्री साडेअकरापर्यंत
2 पुण्यात ३२९ नवे करोना रुग्ण, तर पिंपरीत ८ जणांचा मृत्यू
3 दुपारी झोपण्यावरून पुणेकरांना चंद्रकांत पाटलांचा टोला; म्हणाले, मोदी २२ तास काम करतात