शनिवारी नवी मुंबईत एका दिवसात सर्वाधिक करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एकाच नवी मुंबईत ६५ नवे रुग्ण सापडले आहेत. शहरातील एकूण करोना बधितांची संख्या ५९२ वर पोहोचली असून.२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे.

मृतांमध्ये वाशी येथे वास्तव्यास असलेल्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका कांदा बटाटा विक्रेत्याचा समावेश आगे. तर दुसरी व्यक्ती सानपाड्यात राहणारी असून ती बेस्ट मध्ये कार्यरत होती. आज नवी मुंबईत एकूण ६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी तुर्भेत २१, बेलापुरमध्ये १, नेरुळमध्ये १५, वाशीत ९, कोपरखैरणेत ८, घणसोलीत ५, ऐरोलीत ५ आणि दिघा येथे १ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत पहिल्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. तर सानपाडा येथे राहणारे आणि बेस्टमध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.