HSC Results 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.

मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.४ टक्के लागला आहे. कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC 95.07 टक्के, टक्के निकाल लागला आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?

> http://www.mahresult.nic.in

> http://www.hscresult.mkcl.org

> http://www.maharashtraeducation.com

असा पाहा निकाल –
> वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
> वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
> आसनक्रमांक टाका
> विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
> निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
> निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

त्याचबरोबर http://www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे http://www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

यंदाच्या वर्षी बारावीच्या  परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे.  १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली.