करोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

“अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनेतला एवढंच सांगणं आहे की, तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.” असं पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी, राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी आढावा बैठक घेणार आहेत.

ठाणे, दापोली परभणी नागपूर येथील नमूने आणलेले आहेत. अद्याप केवळ परभणीचा तपासणी अहवाल समोर आला आहे. अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येणं बाकी असल्याची माहिती केदार यांनी यावेळी दिली.

Bird flu in Maharashtra : राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट

तसेच, “केंद्र शासानाने देखील याबाबत थोडं सतर्क होणं गरजेचं आहे. कारण, राज्याने जरी काही केलं, तरी केंद्राला देखील त्यांची भूमिका पार पाडवी लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने स्वतःची अत्यंत आधुनिक अशी प्रयोगशाळा जिथं सर्व नमूने तपासले जातील व उद्या आम्हाला भोपाळला जाण्याची गरज पडणार नाही, अशी प्रयोगशाळा तयार केलेली आहे. परंतु, या प्रयोगशाळेत तपसणीसाठी अद्यापही केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्राने आम्हाला परवानगी दिली पाहिजे.”

“या महाराष्ट्राने या अगोदर २००६ मध्ये अशाप्रकारचा कहर पाहिलेला आहे. त्यावेळी देखील राज्यशासानाने केंद्र सरकारची वाट न पाहता, या राज्यातील पोल्ट्री उद्योगास मदतीचा हात दिला होता. तशाच प्रकारे यंदाही राज्याची भूमिका राहणार आहे. या संदर्भातील आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज सायंकाळाच्या बैठकीत घेतले जातील. महाविकासआघाडी सरकार ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या पोल्ट्री उद्योगास वाऱ्यावर सोडणार नाही.” असं देखील सुनिल केदार यांनी बोलून दाखवलं.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

“परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळे झाल्याचे समोर आल्यानंतर, याबाबत बोलताना केदार म्हणाले की, परभणीतील नमूने आम्ही ज्या दिवशी तपासणीसाठी घेतले, त्याच दिवशी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संबंधित परिसर बंद करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. तिथून कुठलाही पक्षी बाहेर जाणार नाही, गरज पडल्यास तिथे काम करणाऱ्या लोकांनी देखील आवश्यकता नसेल व जोपर्यंत संपूर्ण वैद्यकीय तपासणी होत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नये. तसेच, बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीने देखील तिथे जाऊ नये. अशा प्रकाच्या कडक सूचना केल्या होत्या, त्याचं पालन केल्या गेलेलं आहे व आम्ही ते तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.” असं देखील केदार यावेळी म्हणाले.