देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांपैकी मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील करोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात 137 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, जिल्ह्यातील करोनबाधितांची एकूण संख्या आता 3 हजार 497 वर पोहचली आहे.

आज आढळलेल्या 137 करोनाबाधितांमध्ये 44 महिला व 93 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत 1 हजार 857 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. तर, सद्यस्थितीस 1 हजार 453 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतातपर्यंत 187 जणांचा मृत्यू झालेला आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये वाळूज पंढरपूर (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), बनेवाडी (1), एन नऊ, सिडको (2), शिवाजी नगर (4), न्यू विशाल नगर (2), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (7), राजीव नगर (3), अबरार कॉलनी (1), सातारा परिसर (3), जयसिंगपुरा (6), सुरेवाडी (2), एन बारा हडको (1), बायजीपुरा (1), मयूर नगर, एन अकरा (1), अहिनेस नगर (1), जय भवानी नगर (3), मातोश्री नगर (1), न्यू बायजीपुरा (1), एन बारा, हडको (1), गजानन नगर (5), गरिष नगर (1) , नारळीबाग (1), भावसिंगपुरा (1), कोकणवाडी (1), राम नगर (5), लक्ष्मी नगर (1), समर्थ नगर (1), राज नगर, छत्रपती नगर (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (1), न्यू गजानन कॉलनी (2), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), गादिया विहार, शंभू नगर (1), एसटी कॉलनी, एन दोन (1), एन अकरा, नवनाथ नगर (3), एन अकरा दीप नगर (4), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (3), हनुमान चौक, चिकलठाणा (2), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), विष्णू नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), उल्कानगरी (1), नागेश्वरवाडी (1), सुदर्शन् नगर, हडको (1), एन पाच सिडको (1), कैसर कॉलनी (1), एन दोन, ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), गारखेडा परिसर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (1), एमजीएम हॉस्पीटल जवळ (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (5), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (1), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), छत्रपती नगर, वडगाव (3), राम मंदिराजवळ, बजाज नगर (1), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), पळशी (10), करमाड (1), पिसादेवी (2), कन्नड (6), गंगापूर (2) या भागातील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.