News Flash

चिंताजनक : औरंगाबादेत पुन्हा 17 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 500 च्या उंबरठ्यावर

शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 495 वर पोहचली

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 17 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 500 च्या उबंरठ्यावर म्हणजेच 495 वर पोहचली आहे.

या मुळे आता करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अगोदरच रेडझोमध्ये असलेल्या औरंगाबाद शहारातील नागरिकांची चिंता आता अधिकच वाढली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील संजयनगर, कटकटगेट, बाबर कॉलनी, असेफिया कॉलनी, भवानीनगर, रामनगर (मुकुंदवाडी), सिल्कमिल्क कॉलनी येथील रुग्णांचा समावेश आहे.

शहारातील रुग्ण संख्या अधिकच वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात शहरात तब्बल 100  रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी शहारातील करोनाबाधितांची संख्या 478 वर होती. शनिवारी सकाळी यामध्ये 17 नव्या रुग्णांची भर पडल्याने आता करोनाबाधितांची शहरातील एकूण संख्या 495 झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 11:29 am

Web Title: in aurangabad again 17 positive msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन जण करोनाबाधित
2 प्रतिबंधित क्षेत्र सर्वसामान्यांसाठीच?
3 “दिवसभर फोन घेतले नाही, कुणाकुणाला उत्तर देऊ”, उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज
Just Now!
X