राज्यात आज दिवसभरात जवळपास नव्या रुग्णांइतकेच अॅक्टिव्ह रुग्ण बरे झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी असून रुग्ण बरे होण्याचं वाढलेलं प्रमाणही समाधानकारक आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ३,५७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ३,३०९ अॅक्टिव्ह रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. तसेच दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व आकडेवारीमुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९,८१,६२३ इतकी झाली असून एकूण १८,७७,५८८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ५०,२९१ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या ५२,५५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात २५९ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर आजअखेर शहरातील एकूण रुग्णांची संख्या १,८२,४४८ वर पोहोचली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४,६९३ इतकी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ३८० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर १ लाख ७५ हजार १५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १४६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १७ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.