राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, स्वतःच्या पायावर उभे राहावे असा सल्ला देत एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. भाजपाला चिमटा काढतानाच खडसे यांनी शरद पवार यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते बुधवारी रावेरमध्ये श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. मध्यस्थ, दलाल आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर राहू नये. आता त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, शेतकऱ्यांच्या हक्काची कंपनी स्थापन करावी, असे त्यांनी सांगितले. सरकारकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

[jwplayer iJwXXZEi-1o30kmL6]

खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे खडसे यांनी भरभरुन कौतुक केले. बारामतीमध्ये शरद पवार यांनी कृषिक्षेत्रात संधोशन करुन बदल घडवले. मलाही हल्ला बारामतीमध्ये जाऊन राहावे असे वाटते, असे त्यांनी सांगितले. माझी आणि पवारांची जुनी मैत्री असून पवार यांनी कृषिमंत्रीपदावर केलेल्या कामाची मी नेहमीच कौतुक केले आहे, अशी आठवण त्यांनी सांगितले. खडसे यांनी पवारांचे कौतुक केल्याने यावरुन तर्कवितर्कही लढवले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला मी उपस्थीत असलो तरी, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही. माझ्या मनात जे आहे ते मी अजित दादांच्या कानात सांगितले, असे खडसेंनी म्हटले होते.