News Flash

Lockdown: पालघर येथून मध्य प्रदेशच्या नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे गाडी रवाना

ट्रेन रवाना होत असताना प्रवाशांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' च्या दिल्या घोषणा

पालघर : लॉकडाउनमुळं अडकलेल्या मध्य प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांसाठी रविवारी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाळेबंदीत अडकलेल्या सुमारे १,२०० नागरिकाना घेऊन पालघरहून मध्यप्रदेश येथे जाणारी पहिली श्रमिक विशेष ट्रेन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रवाना झाली. ट्रेन रवाना होत असताना प्रवाशांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणांनी पालघर रेल्वे स्थानक दुमदुमून गेले.

पालघर रेल्वे स्थानकातून आज ९.१५ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार सुनील शिंदे, यांच्यासह आरोग्य, पोलीस, रेल्वे प्रशासनाचे लोहमार्ग पोलीसअधीक्षक, अधिकारी-कर्मचारी यांनी प्रवाशाना शुभेच्छा देत ही ट्रेन रवाना करण्यात आली. या गाडीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

आरंभी काही काळ प्रवाश्यांचे नियोजन झाले नसले तरी कालांतराने रेल्वे प्रशासनमार्फ़त नंतर योग्य फिजिकल डिस्टंसिंगचे नियोजन करून सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रवासादरम्यान लागणारे जेवण, मास्क, पाण्याची बाटल्याही प्रशासनातर्फे देण्यात आल्या. पालघरमधील प्रशासनाच्या व निऑन फाउंडेशन तसेच जैन समाजाकडून चालविल्या जाणाऱ्या कम्युनिटी किचनमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच स्वयंसेवकांमार्फत नियोजनही करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 10:01 pm

Web Title: lock down first train carrying citizens of madhya pradesh from palghar aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भूमीपुत्रांविषयी पुतनामावशीचं प्रेम उघड – भाजपा
2 रायगड : उरणमध्ये एकाच कुटुंबातील २१ जणांना करोनाची लागण
3 Lockdown: रेल्वे पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळं फिजिकल डिस्टंसिंगची ऐशीतैशी
Just Now!
X