लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : हरवलेल्या मुलाला भेटण्यासाठी गेले सहा महिने कासावीस झालेल्या एका आईची माया मंगळवारी फळाला आली. सहा महिन्यापूर्वी हरवलेला मुलगा बाल कल्याण समितीने आईच्या स्वाधीन केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत त्या आईने अक्षरश: हंबरडा फोडला. आपल्या मुलाला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद त्या माऊलीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रेखा पवार पती व आपल्या तीन मुलांसह १९ फेब्रुवारी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या फलाटावर झोपी गेली. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या दीड वर्षीय सुमितला कुणी तरी अलगद उचलून नेले. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच प्रकरण पोलिसांत गेले. शोधशोध सुरू झाली. आई आणि लेकराची ताटातूट त्यात कुटुंबाच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे दोन वेळच्या जेवणाचा यक्ष प्रश्न. गावात जाऊन मोल मजुरी सुरू झाली. मुलाचा शोध लागला की नाही हे जाणून घेण्यासाठी माऊलीचे अकोल्याला येऊन पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवणे सुरूच होते. या आईची ही धडपड १६ मेपर्यंत सुरू होती. दरम्यान, हरवलेला सुमित नागपूरला सापडला.

बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण यांनी सुमितला मातृसेवा संघाच्या शिशूगृहात ठेवले. २० मे रोजी अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिसांनी आई-वडिलांचा संपर्क करून मुलगा सापडल्याची आणि तो सुखरुप असल्याची माहिती दिली. आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे आणि न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया करून नागपूर आणि अकोला बालकल्याण समितीच्या ऑनलाइन बैठका झाल्या. दरम्यान, आईचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरूच होते. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित मंगळवारी नागपूरहून अकोल्याला आला. गेले सहा महिने आपल्या मुलाच्या भेटीसाठी आसूसलेली आईची अखेर मुलाशी भेट झाली.

आई-मुलाची भेट घडविण्यात अनेक सहृदयी शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाºयांचे सहकार्य लाभले. त्यात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, बालकल्याण समितीच्या सदस्या प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घाटे आणि पेशवे आदींचा समावेश आहे.