News Flash

CAA, NRC विरोधात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद

या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे

CAA, NRC आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सुमारे २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

देशात NRC आणि CAA विरोधात प्रचंड रोष आहे. अनेक राज्यांमध्ये यावरुन आंदोलनं आणि जाळपोळही झाली. सरकारने हा कायदा लागू केला आहे यामागे त्यांची दडपशाही आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही बंदचं आवाहन केलं आहे. आमच्या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे असं प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 7:33 am

Web Title: maharashtra bandh called by vba against caa nrc scj 81
टॅग : CAA
Next Stories
1 महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रचलं जातंय कारस्थान; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
2 निवडणूक प्रचारासाठी राजमुद्रा असलेला झेंडा नको-राज ठाकरे
3 देशात गोंधळ-गडबड वाढीस, प्रगतीची पडझड-शिवसेना
Just Now!
X