News Flash

Maharashtra HSC Result 2017 : बारावीचे निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता

विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत

Mhssc SSC result 2017 Maharashtra Board 10 class result : बोर्डाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, विद्यार्थी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागेल, अशी अपेक्षा बाळगून आहेत.

२८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, महाराष्ट्र शिक्षण मंडळ पुढील आठवड्यात निकाल जाहीर करण्यासंदर्भात तयारी सुरु केली आहे.  कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखेत मिळून जवळपास १५ लाख विद्यार्थी निकालाची प्रतिक्षा करत आहेत. यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थांची  संख्या अधिक असून त्यानंतर कला आणि सर्वात कमी वाणिज्य शाखेला पसंती दिली होती.

बारावीनंतर काय कराल?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 12:43 pm

Web Title: maharashtra hsc result 2017 maharashtra board 12th result expected next week
Next Stories
1 Watch Video: लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात
2 दिवाकर रावतेंना बेळगावमध्ये प्रवेश नाकारला
3 संपासाठी तरुण शेतकऱ्यांचा पुढाकार
Just Now!
X