महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ६४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ५२७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख १४ हजार ६४८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत १ लाख ५८ हजार १४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्रमुख शहरांमधल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – २४ हजार ३०७
ठाणे – ३४ हजार ८२१
पुणे- २७ हजार ३८९
नाशिक ३ हजार २५
कोल्हापूर- ६२१
औरंगाबाद- ३ हजार ६२६
नागपूर- ८३२

आज राज्यात ८ हजार ६४१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली आहे.