मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ११ हजार ४४७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत करोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ७६ हजार ६२ इतकी झाली आहे. दरम्यान मागील चोवीस तासांमध्ये १३ हजार ८८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ४४ हजार ३६८ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ८९ हजार ७१५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ३०६ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४१ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३०६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या ७९ लाख ८९ हजार ६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ७६ हजार ६२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या २३ लाख ३३ हजार ५२२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २३ हजार ४०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ८९ हजार ७१५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ३०६ मृत्यूंपैकी १११ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १२५ मृत्यू एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.