महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजार ९०२ रुग्ण करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ८९.६९ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८ लाख ३७ हजार १३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ६६ हजार ६६८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १२ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख २७ हजार अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार ९०२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ६६ हजार ६६८ इतकी झाली आहे.