राज्यातील बलाढय़ अशा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा मतदारसंघातील उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देताना, कारखाना कार्यक्षेत्रातून भरघोस मताधिक्याची हमी दिली आहे. उदयनराजे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मोहिते यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर उदयनराजेंनी कृष्णा कारखाना कार्यस्थळी अविनाश मोहिते यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी ढोल ताशांच्या गजरात अन् फटाक्यांच्या आतषबाजीत उदयनराजेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. उदयनराजे यांनी शरद पवारांनी पुन्हा दिलेल्या संधीचे सोनं करू अशी ग्वाही देताना, पवारांचे हात बळकट करू या, असे आवाहन केले. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते अॅड. बाळासाहेब शेरेकर, कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची या वेळी उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य देऊ -अविनाश मोहिते
राज्यातील बलाढय़ अशा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा मतदारसंघातील उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देताना, कारखाना कार्यक्षेत्रातून भरघोस मताधिक्याची हमी दिली आहे.

First published on: 27-03-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majority record will give to udayanraje bhosale avinash mohite