27 February 2021

News Flash

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत?, राऊत म्हणाले…

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरुन त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच कळेल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत. राज्यात आता आमचं सरकार विराजमान झालं आहे, असं सांगताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले. तसेच बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशा शब्दांत त्यांनी या प्रकल्पाला स्थगितीच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा दिला. तसेच नाणारबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री विचार करतील, असेही राऊत म्हणाले. भाजपा खासदार अनंत हेगडे यांच्या दाव्यावर फडणवीस नाही तर मुख्य सचिव खुलासा करतील, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा- पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?; भाजपाला बसणार हादरा

राज्यातील खाते वाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मंत्रीमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो. खातेवाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद असल्याच्या प्रश्नावर मी त्यांच्या बैठकांना उपस्थित असतो त्यामुळे असं काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गृहमंत्रीपद राष्ट्रवादी की शिवसेनेला द्यायचे याचा निर्णयही मुख्यमंत्री घेतली असे त्यांनी सांगितले.

राहुल बजाज यांनी केंद्रावर नुकतीच टीका केली होती यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “मी राहुल बजाज यांना ओळखतो. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. त्यामुळे राहुल बजाज यांच्या वक्तव्याने कोणालाही दुःख होण्याचे कारण नाही. त्यांना ते बोलणाचा अधिकार आहे. सध्या देशातील उद्योगपतींना जे वाटतयं तेच त्यांनी बोलून दाखवलं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 12:36 pm

Web Title: many big leaders of the state are in touch with shiv sena says sanjay raut aau 85
Next Stories
1 पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?; भाजपाला बसणार हादरा
2 ‘केंद्राकडे भीक का मागताय?’; निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल
3 ही महाराष्ट्राशी गद्दारी; हेगडेंच्या विधानावर संजय राऊत संतापले
Just Now!
X