तालुक्यातील बाभळेश्वर येथील श्रीरामपूर दूध जिल्हा संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, माजी आमदार प्रसाद तनपुरे, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे असे सगळे एकवटले आहेत. याच दोन गटांमध्ये सरळ लढत होणार आहे.
श्रीरामपूर दूध संघाची दि. २५ जूनला निवडणूक होणार आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. छाननीत ९ अर्ज बाद झाले. बुधवारी ८४ इच्छुकांनी माघार घेतल्याने १६ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात राहिले. संस्थेच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव (३ सभासद), राहाता (४१), श्रीरामपूर (४७), राहुरी (८३), नेवासा (४८) असे पाच तालुक्यांत एकूण २२२ मतदार आहेत. संघाचे माजी अध्यक्ष म्हस्के व तनपुरे गट यांना प्रत्येकी ५, गडाख गटास ४ व ससाणे गटास २ असे जागावटप निश्चित झाले आहे. या सर्व नेत्यांच्या विरोधात भानुदास मुरकुटे यांनी स्वतंत्र पॅनेल तयार केल्याने निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहे आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न होते, मात्र ते यशस्वी झाले नाहीत.
निवडणूक रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे- सर्वसाधरण मतदारसंघ- महेंद्र शेळके, संध्या गोर्डे, रावसाहेब म्हस्के, शकुंतला चौधरी, सचिन ढूस, गोरक्षनाथ गाडे, भाऊसाहेब टेमक, शारदा देशमुख, वसंतराव शेरकर, मुक्ताबाई माकोणे, राजेंद्र पाऊलबुद्धे, यशवंत भोसले, चांगदेव चिंधे, भाऊसाहेब हाळनोर, प्रताप शेटे, अशोक थोरे, जनार्दन घुगरकर, शोभा काळे, सुभाष चौधरी, विलास तनपुरे व अनिल खर्डे. अनुसूचित जाती/जमाती- प्रभाकर कांबळे, विलास ठोंबरे, रावसाहेब पवार. महिला- सुनीता घोरपडे, अरुणा तनपुरे, आशाबाई गायकवाड, पद्मा भोसले, विजया लोंढे. इतर मागासवर्गीय-बाबासाहेब कोतकर, भाऊसाहेब गिरमे, जयंत गिरमे, प्रदीप पवार. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग- विजय नागरे, बाळासाहेब मंडलिक, रावसाहेब तमनर.