एमआयडीसीच्या गस्ती पथकाकडून कारवाई

पालघर: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसी व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून पाणी घेण्यास मज्जाव असताना कूपनलिका व टँकरमधून पाणीपुरवठा करण्यावर उद्योजकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यातून पळवाट शोधून काढताना एका उद्योजकाने प्लास्टिकच्या नव्या ड्रममधून पाणीपुरवठा करण्याची युक्ती एमआयडीसीच्या गस्ती पथकाने पकडले आहे.

तारापूर येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील क्षमतेमधील मर्यादा लक्षात घेऊन एमआयडीसीकडून पाणीपुरवठा घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत. या क्षेत्रात कूपनलिकामधून पाणी घेण्यावर मज्जाव करण्यात आला असून पाण्याचा टँकरमधून देखील पाणी घेण्यास रोख लावण्यात आली

आहे. यावर युक्ती म्हणून काही उद्योजकांनी या पूर्वी रासायनिक टँकरमधून रसायन वाहतुकीचा बनाव करून पाणीपुरवठा करण्याचे प्रकार घडले होते. मात्र, यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर तसेच लोकसत्तामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर असे प्रकार थांबविण्यात आले.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक एल ३९ या ठिकाणी असणाऱ्या विकास इंडस्ट्रीस या उद्योगाने यावर पळवाट म्हणून नव्या कोºय प्लॅस्टिकच्या ड्रममधून पाणी आणण्याची युक्ती लढवली. याबाबतची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने पाणी वाहून नेणाऱ्या वाहनाला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पाण्याचे २६ ड्रम असल्याचे आढळून आले असून तारापूर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.