प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकाच्या खात्यात जमा करावे, अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभरात दूध आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील विविध भागात संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले. तर काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या. मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा तोडण्याचा संघटना प्रयत्न करत आहे. दुसरीकडे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारही प्रयत्न करत असून रविवारी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. यावर खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LIVE UPDATES:

कोल्हापूर: गोकूळ दूध संघाचे आज संकलन बंद

– सोलापूर: दूधपंढरीचे जिल्ह्यातील दूध संकलन बंद. दररोज दीड लाख लिटर दूध संकलन. दूधपंढरीचा आंदोलनाला पाठिंबा

– नाशिकहून दुधाचे १५ टँकर पोलिसांच्या संरक्षणाखाली मुंबईला रवाना: जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण

– दूध आंदोलनावरून विरोधकांचा सभात्याग

– नागपूर : राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे: दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक करून खासदार राजू शेट्टी मुंबईकडे रवाना झाले.

– रिधोरे (ता. माढा, जि. सोलापूर) येथे नेचर दूध कंपनीच्या पिशव्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फेकल्या.

सोलापूर येथे दूधाचा टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले.

– वसई: विरारमध्ये अमूल दूधाच संकलन बंद

– औरंगाबाद: लाडसांगवीमध्ये आंदोलन सुरू

– बुलडाणा: कार्यकर्त्यांनी दुधाचा ट्रक अडवला

– नाशिक: दुधाच्या टँकरला पोलीस संरक्षण देणार- दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची माध्यमांना माहिती.

– दुधाचा संप चालू असल्याने ढोकी (जि. उस्मानाबाद) येथील दुध उत्पादक अनिल कोकाटे यांनी २० लिटर दूध तेरणा साखर कारखाना प्रशालेतील विद्यार्थ्यांना दिले.

– हडपसरकडे येणार सोनाई दुधाचा टँकर परत पाठवला
– बीड: सोमेश्वर मंदीरात अभिषेक घालून अंदोलन सुरु.
– संगमनेर येथून औरंगाबादला जाणारा टेम्पो हडस पिंपळगाव येथे फोडला.
– पुण्यातील आंबेगाव येथील गोवर्धन दूध संघाचा टँकर फोडून दूध रस्त्यावर फेकून दिले.
– मध्यरात्री उशिरा खासदार शेट्टी यांनी पंढरपुरात श्री पांडूरंग चरणी दुधाचा अभिषेक घालून रणशिंग पुकारले.