26 February 2021

News Flash

मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त; गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप

भाजपाचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी केली होती तक्रार

संग्रहीत

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती पासपोर्ट अर्जात लपवल्याचा आरोप आहे. भाजपाचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे भांगडिया यांनी, याप्रकरणी मी अनेकदा मुख्यमंत्री व पासपोर्ट कार्यालयाकडे तक्रार केली होती, मात्र कारवाई होत नसल्याने अखेर मला न्यायालयात धाव घ्यावी लागली असल्याचं सांगितलं आहे. भांगडिया यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. भांगडिया हे विधानपरिषदेचे माजी सदस्य देखील आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पासपोर्ट कार्यालयाने कागदपत्रांची तपासणी करून वडेट्टीवारांना बोलावलं, तेव्हा वडेट्टीवार यांनी त्यांचा पासपोर्ट जमा केला होता. तो पासपोर्ट आता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नागपूर कार्यालय चौकशी करत आहे.

पासपोर्टसाठी वडेट्टीवार यांनी मनोरा या आमदार निवासाचा पत्ता दिलेला होता व तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्याची एनओसी देखील जोडली होती. या एनओसीत वडेट्टीवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे नमूद होते. यावर भांगडिया यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे.

माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र – वडेट्टीवार
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी आरोप फेटाळून लावला आहे. माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचं ते म्हणाले आहेत. माझ्यावर कोणताही गंभीर गुन्हा दाख नाही, जे चार गुन्हे दाखल होते ते किरकोळ राजकीय गुन्हे होते. असं वडेट्टीवार म्हणाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 7:16 pm

Web Title: minister vijay vadettiwars passport confiscated alleged concealment of crime information msr 87
Next Stories
1 रायगड, बदलापूर, कर्जत-खालापूरसह खोपोलीत पावसाची जोरदार हजेरी
2 “संभाजीनगर ही टायपिंग एरर, ट्विटर हॅण्डल करणाऱ्या व्यक्तीला…”; ‘त्या’ ट्विटसंदर्भात मंत्र्याचं स्पष्टीकरण
3 सोलापुरात शिवसेनेला धक्का, विरोधी पक्षनेते महेश कोठे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Just Now!
X