सुधागड पाली तालुक्यातील आदिवासी वस्तीचे पाणी तोडणे तसेच वहिवाटीचा रस्ता बंद केल्याप्रकरणी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य विजय सावंत आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना माणगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अनुसुिचत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सावंत यांना २ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सुधागड पाली तालुक्यातील दुधानी ताडगाव येथे विजय सावंत यांचा रामेश्वर वैभव रिसॉर्ट आहे. या प्रकल्पासाठी १९८२ साली सावंत यांनी पुर्षोत्तम लिमये यांच्याकडून जागा खरेदी केली होती. या जागेवर अनेक वर्षांपासून आदिवासींची वस्ती होती. जागा खरेदी केल्यानंतर सावंत यांनी आदिवासींकडे जागा खाली करण्याचा तगादा लावला होता. त्यावरून सावंत यांनी सहकाऱ्यांसह आदिवासी वाडीला पाणी पुरवठा करणारी वाहिनी तोडून त्याठिकाणी भराव करून वस्तीकडे जाणारी वहिवाट बंद केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2016 12:24 am