News Flash

…तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री “जगात भारी” ; संदीप देशपांडेंनी लगावला टोला!

१३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत झालेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे.

प्रश्नम या संस्थेने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे.(संग्रहीत छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. तर, या सर्वेक्षणाच्या निकालावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावल्याचे दिसून येत आहे.

”पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोडची मिसळ “जगात भारी” पुण्याची मस्तानी “जगात भारी” चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री “जगात भारी”…”असं ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.

एकच नंबर! उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ राज्यांमध्ये करण्यात आला सर्व्हे

दरम्यान, प्रश्नम या संस्थेने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे. पहिल्या फेरीत १३ राज्यांमध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणारी राज्ये आहेत. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांना याबाबत मतं विचारण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 6:27 pm

Web Title: mns leader sandeep deshpande targeted chief minister uddhav thackeray msr 87
टॅग : Mns
Next Stories
1 महाविकास आघाडीत धुसफूस?; शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
2 फडणवीसांसोबत काय चर्चा झाली?, छगन भुजबळांनी केला खुलासा; म्हणाले…
3 वारकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे – दरेकर
Just Now!
X