30 May 2020

News Flash

जिंतुरात मनसेची नामुष्की; आघाव यांची हकालपट्टी

जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३९ पैकी ५८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यात ८१ उमेदवार िरगणात राहिले आहेत. उपमहापौर सज्जूलाला यांनी

| October 2, 2014 01:10 am

जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३९ पैकी ५८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यात ८१ उमेदवार िरगणात राहिले आहेत. उपमहापौर सज्जूलाला यांनी एमआयएमकडून भरलेला अर्ज कायम ठेवला. भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे यांनी गंगाखेडमधून माघार घेतली. रबदडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. जिंतूरमधील मनसेचे उमेदवार खंडेराव आघाव यांनी अर्ज मागे घेतल्याने पक्षावर नामुष्की ओढवली. आघाव यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक पवार यांनी स्पष्ट केले.
अर्ज माघारीनंतर चारही मतदारसंघांत लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. परभणी मतदारसंघात सर्वाधिक २५ उमेदवार, जिंतूर व गंगाखेड १९, तर पाथरीत १८ उमेदवार िरगणात आहेत. परभणीत आनंद भरोसे (भाजप), दत्तात्रय कदम (बसप), इरफानुर रहेमान खान (काँग्रेस), विनोद दुधगावकर (मनसे), प्रताप देशमुख (राष्ट्रवादी), डॉ. राहुल पाटील (शिवसेना) असे प्रमुख, तर समाजवादी पक्षाचे मन्सूर खान, एमआयएमचे सय्यद खालेद, सुधीर साळवे, उद्धव िशदे, विठ्ठल तळेकर आदी उमेदवार आहेत.  
पाथरीत राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी, मीरा रेंगे (शिवसेना), हरिभाऊ लहाने (मनसे), सुरेश वरपुडकर (काँग्रेस), विलास बाबर (माकप), विजय सीताफळे (स्वाभिमानी शेतकरी संघटना), मोहन फड (अपक्ष) आदी १८ उमेदवार आहेत. गंगाखेडमध्ये महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून रत्नाकर गुट्टे यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष रबदडे यांनी अर्ज दाखल केला होता. रबदडे यांनी माघार घेतली. भाजपचे ज्येष्ठ कार्यकत्रे श्यामसुंदर मुंडे यांची उमेदवारी मात्र कायम आहे. सीताराम घनदाट (अपक्ष), डॉ. मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी), डॉ. शिवाजी दळणर (शिवसेना), बालाजी देसाई (मनसे), चित्राताई दुधाटे गोळेगावकर (शेकाप), रविकांत चौधरी (काँग्रेस) आदींसह १९ उमेदवार आहेत.
जिंतूरमध्ये मनसेने खंडेराव आघाव यांना मैदानात उतरविले होते. मात्र, आघाव यांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे येथे मनसेचा उमेदवार नसेल. आघाव यांची पक्षाने अखेर हकालपट्टी केली. जिल्हा संपर्क अध्यक्ष दीपक पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना ‘दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराशी संधान साधून आघाव विकले गेले. त्यांनी वंजारी समाजाची फसवणूक केली’, असा आरोप केला. रामप्रसाद बोर्डीकर (काँग्रेस), विजय भांबळे (राष्ट्रवादी), संजय साडेगावकर (भाजप), राम पाटील (शिवसेना), कॉ. राजन क्षीरसागर (भाकप) आदींसह १९ उमेदवार येथे रिंगणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2014 1:10 am

Web Title: mns trouble in jintur
Next Stories
1 कार्यकर्त्यांचा संताप बघून भाजपने आर्णीत अखेर उमेदवार बदलला
2 चंद्रपूर जिल्ह्य़ात कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारही संभ्रमात
3 उमेदवारांना भुलविणाऱ्या टोळ्या सक्रीय
Just Now!
X