22 September 2020

News Flash

खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण

सुरक्षित राहण्याचं नवनीत राणा यांचं आवाहन

संग्रहित

खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनीत राणा यांनी याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना करोनाची बाधा झाली आहे. नवनीत राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे. राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:31 pm

Web Title: mp navneet rana tests corona positive sgy 87
Next Stories
1 फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द
2 मदत आणि बचाव कार्यासाठी राज्यभरात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात
3 मंदिर-मशिदीच्या लाऊडस्पीकरवर भरते मुलांची शाळा, अक्कलकोटमधील शिक्षकाचा अनोखा उपक्रम
Just Now!
X