News Flash

एसटी कर्मचाऱयांचा संप आजही सुरूच, प्रवाशांचे अतोनात हाल

एसटी कर्मचाऱयांच्या इंटक या काँग्रेस प्रणित संघटनेने हा संप पुकारला आहे.

पगारवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या(एसटी) कर्मचाऱयांचा संप शुक्रवारी देखील कायम आहे. एसटी कर्मचाऱयांच्या इंटक या काँग्रेस प्रणित संघटनेने हा संप पुकारला असून, यात राज्यातील ३५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा इंटकने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, पगारवाढीची मागणी योग्य असली तरी संप करणे चुकीचे आहे. एसटी कर्मचाऱयांना प्रवाशांना वेठीस धरू नये, असे रावते म्हणाले आहेत. तसेच संपकारी कर्मचाऱयांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचेही संकेत सरकारने दिले आहेत. २५ टक्के पगारवाढीसाठी इंटक संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 12:29 pm

Web Title: msrtc workers strike continues for second day
Next Stories
1 किडनी प्रत्यारोपणाच्या कागदपत्रांसाठी बनवाबनवी
2 लोकबिरादरी प्रकल्पात आनंदाचे वातावरण
3 शेतजमीन कोणालाही खरेदी करण्याची सशर्त मुभा
Just Now!
X