• दोन वर्षांपासून शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत
  • दुसऱ्या टप्प्यातील काम रखडण्याची शक्यता

मुंबई गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम रखडण्याची शक्यता आहे. महामार्ग भुसंपादनासाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधी शासनाकडून प्राप्त झालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून २५ गावातील शेतकरी भुसंपादन मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबई गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर काम २०११ पासून रखडले आहे. २०१९ आजाडले तरी रस्त्याचे काम पुर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता इंदापूर ते कशेडी दरम्याचे काम रखडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण महामार्ग भुसंपादनासाठी आवश्यक असलेला निधीच जिल्हाप्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही, त्यामुळे आजही अनेक शेतकरी जमीन संपादन मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबई- गोवा महामार्गावरील दुसरया टप्प्यातील इंदापूर ते वडपाले या दरम्यान २६ गावातील जागेचे संपादन करणे गरजेचे आहे. यातील लोणेरे वगळता २५ गावचे संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोणेरे येथील अधिसूचना निघून अनेक महिने उलटून गेले तरी अद्याप या गावातील भूसंपादन झालेले नाही.

इंदापूर ते वडपाले या दरम्यान भूसंपादन प्रक्रियेकरीता ७०९ कोटीची आवश्यकता होती. मात्र  २०१६-१७ मध्ये लोणेरे वगळता २५ गावांसाठी  ५२६ कोटी रुपये प्राप्त झाले. या पशाचे मोबदला स्वरूपात उपविभागीय महसूल अधिकारी ( प्रांत )मार्फत वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही २५ गावांसाठी अद्याप अंदाजे १८३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र ते प्राप्त झालेले नाहीत.

लोणेरे या गावच्या  भूसंपादनाची अधिसूचना काढून अनेक महिने उलटले असले तरी निधी उपलब्ध नसल्याने निवडा होत नसल्याचे सूत्रानुसार समजते. लोणेरे येथील संपादन प्रक्रियेकरीता सुमारे १५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र तोही अद्याप उपलब्ध झालेला नाही. भुसंपादनाची काम रखडल्याने या टप्प्यातील महामार्गाची काम आता रखडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

केंद्रीय रस्तेन वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यामचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व येथील पालकमंत्री रिवद्र चव्हाण यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून मुंबई – महामार्ग २०१९पर्यत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. मात्र हिच परिस्थिती कायम राहिल्यास दिलेल्या मुदतीत काम करणे कठीण होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते वडपाले चे कंत्राट चेतक एंटरप्राईजला तर वडपाले कशेडी पर्यत चे काम एल. एन. टी. या कंपनीला दिले आहे. काही शेतकारयांना मोबदला दिला नसल्याने त्यांनी जमिनीचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे सलग रस्ता या कंत्राटदारंना करतांना अडचणी येत आहेत.

लोणेरे येथील भूसंपादन प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असुन त्याबाबत त्याची थ्रीडी  काढली आहे. पुढील आठवड्यात लोणेरे येथील निवाडा तयार होईल ,तसेच या भूसंपादन करीता लोणेरे व इतर गावातील शिल्लक शेतकर्यानां मोबदला देण्याकरीता निधी उपलब्ध नाही , आणि कधी येईल ते पण सांगता येणार नाही.  या निधी करीता आम्ही वेळोवेळी स्मरण पत्र संबधित विभागास पाठवीत आहोत. निधी उपलब्ध झाला की मोबदल्यायचे वाटप करण्यायत येईल .     – प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी , माणगाव

माझी रेपोली येथील महामार्गालगतची जागा रुंदीकरणात गेली असुन त्या मोबदल्याकरीता दीड वर्षांपूर्वी नोटीस मला मिळाली आहे.परंतु अद्याप मला मोबदला मिळालेला नाही. प्रांत कार्यालयात गेले अनेक महिने फेऱ्या मारुन देखील मला मोबदल्याचे पसे मिळत नाहीत .     – शंकर नथुराम नाडकर, शेतकरी, रा. रेपोली

सुरवातीला ५०० कोटीचा मूळ निवडा हा साडेसातशे कोटीवर गेला आहे. या बाबत चा वाढीव सुधारीत प्रस्ताव आम्ही कोकण भवन येथील संबधित विभागाकडम दिला आहे. या जमिनीचा मूळ निवाडा देण्याकरिता ५०० कोटी आले होते. परंतु जमिनीचे दर वाढले आहेत. त्यानुसार वाढीव निधी करीता प्रस्ताव पाठवला आहे.     – पी. पी. गायकवाड,  उप विभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय पेण