19 September 2020

News Flash

नाना पटोलेंनी लढले पाहिजे, माझा त्यांना आशीर्वाद: नितीन गडकरी

काँग्रेसला आपला उमेदवार देण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांना माझा आशीर्वाद आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या असून आपला त्यांना आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे.

भाजपातून काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमदेवारी जाहीर झाली आहे. ते आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या असून नानांना आशीर्वाद दिला आहे. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.

नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे सहकारी होती. मधल्या काळात भाजपाबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आता त्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात उमदेवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. ते पूर्वीही माझे मित्र होते आणि आताही माझे मित्र आहेत, असेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसला आपला उमेदवार देण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांना माझा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. धर्म, जात, पंथ न पाहता मी मी लोकांची कामे केली. मी विकासाचे राजकारण केले. मी कधी कोणाला कमी लेखत नाही व मोठे ही मानत नाही, असे म्हणत मी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 1:03 pm

Web Title: my blessings with nana patole says bjp leader nitin gadkari lok sabha 2019
Next Stories
1 ‘सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय? नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का?’
2 वार्‍याची दिशा समजल्याने शरद पवारांची माघार – विजय शिवतारे
3 धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर
Just Now!
X