01 March 2021

News Flash

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला; लता मंगेशकर आमचे दैवत…”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत केला खुलासा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले...

“शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लता मंगेशकर आमचे दैवत आहेत.” असं आज(सोमवार) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलाताना सांगितलं.

तसेच, “सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर १२ इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत.” असं देखील यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं.

ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर मोदी सरकारकडून दबाव?; ठाकरे सरकार करणार चौकशी

झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली होती.

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”

यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेत अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतुल भातखळकर व आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. “संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असं फडणवीस यांनी ट्विट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 5:20 pm

Web Title: my statement was distorted i said bjps it cell should be investigated anil deshmukh msr 87
Next Stories
1 खेड तालुक्यातील एकाच गावात आढळले २७ करोनाबाधित रूग्ण; आरोग्य यंत्रणा हादरली
2 …संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार – अनिल देशमुख
3 “ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली आहे”
Just Now!
X