20 September 2020

News Flash

खंडणीप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील बर्गे यांना अटक

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपात असणारे सुधीर बर्गे यांना अटक करण्यात आली आहे

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपात असणारे सुधीर बर्गे यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. सुधीर बर्गे यांच्यासहित अजून दोघांना अटक करण्यात आली आहे.

सुधीर बर्गे यांच्यासहित माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी, आरिफ इराकी यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही माहिती अधिकार आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून खंडणी उकळली जात असल्याचा आरोप आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाणे आणि मुंबईत आरटीआय कार्यकर्त्यांचं खंडणी उकळणारं रॅकेट सुरु असल्याची तक्रार केली होती. सहा महिन्यांपूर्वी ही तक्रार करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना यासंबंधी चौकशी करण्याचा आदेश दिला होता. चौकशीअंती तिघांचं नाव समोर आलं असून अटकेची कारवाई कऱण्यात आली आहे.

२००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:45 pm

Web Title: ncp former coporator sudhir barge arrested in extortion case
Next Stories
1 इकबाल कासकरला व्हीआयपी वागणूक देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन
2 दिवाळीचा गोडवा महाग!
3 ठाण्यात सरसंघचालकांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते दक्ष
Just Now!
X