News Flash

भाजपा चुकत असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा जबाबदार – छगन भुजबळ

असंगाशी संग कशाला असा सवाल करतानाच ढवळया शेजारी बांधला पवळ्या गुण नाही पण वाण लागला असल्याची जोरदार टिका माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली.

संग्रहित छायाचित्र

नरेंद्र मोदी हे पहारेकरी चोर आहेत असं सांगता तर मग त्यांच्यासोबत का बसता…असंगाशी संग कशाला असा सवाल करतानाच ढवळया शेजारी बांधला पवळ्या गुण नाही पण वाण लागला असल्याची जोरदार टिका माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पारनेरच्या जाहीर सभेत शिवसेनेवर केली.

भाजपा सत्तेत राहून चुका करत असेल तर त्या चुकांमध्ये उध्दव ठाकरे तुम्ही सुद्धा जबाबदार आहात असा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील जाहीर सभेत आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

निलेश लंकेच्या प्रवेशानंतर पारनेरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होईल – जयंत पाटील
निलेश लंके यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश झाला असल्याचे जाहीर करतानाच भविष्य काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होईल असा शब्द प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पारनेरच्या जाहीर सभेत दिला.

आजची पारनेरची प्रचंड मोठी सभा पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार निवडून येईल हे स्पष्ट झाले आहे असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील म्हणाले.

अर्थसंकल्प आता मांडला जाणार आहे.त्यावेळी इतक्या घोषणांचा पाऊस पडणार आहे की यापूर्वी कुणीच काही दिलं नाही हे दाखवलं जाणार आहे हे आता लक्षात घ्या असे आवाहनही आमदार जयंतराव पाटील यांनी केले.
तुम्हाला फसवणारी टोळी दिल्लीत आणि राज्यात आली आहे आणि हीच टोळी घालवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:47 pm

Web Title: ncp leader chhagan bhujbal slam shivsena
Next Stories
1 सत्ताधाऱ्यांना सरकार चालवायची अक्कल नाही – धनंजय मुंडे
2 तावरजखेड्यात महिनाभरात तीन शेतकरी आत्महत्या, अस्थिकलश देवून करणार प्रशासनाचा निषेध
3 ५ महिन्यांच्या बाळाची लाळ थांबवण्यासाठी फिरवलेला जिवंत मासा अडकला अन्ननलिकेत
Just Now!
X