भाजपासोबत ५० टक्के पापात सहभागी असलेली शिवसेना ‘आम्ही नाही त्यातले’ अशी भूमिका घेवून विरोधी पक्षाचे विचार मांडत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केली.
देश आणि राज्यातील भाजपा सरकार बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा राज्यभर काढण्यात येत असून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कशी फसवणूक केली, याची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
पाटील यांनी भाजपा सरकारच्या फसव्या घोषणा आणि मंत्र्यांचे घोटाळे व मुख्यमंत्र्यांनी दिलेली बोगस आश्वासनांची व्हिडिओ क्लिप दाखवून जोरदार प्रहार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.