शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मध्यावधी निवडणुकीचा दावा फेटाळून लावला. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असं ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी भेटीवर बोलताना सांगितलं की, “संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही.

फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असा दावा केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली,” असल्याचं म्हटलं. यावर बोलताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे खंडन केलं. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असं ते म्हणाले आहेत.

“दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर…,” राऊत-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

रामदास आठवलेंना टोला
शरद पवारांनी आठवलेंच्या एनडीएमध्ये येण्याचा प्रस्तावावर बोलताना सांगितलं की, “रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही”.