X
X

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान ?

अपमान झाल्यानेच शरद पवार शपथविधीला गैरहजर राहिले अशी चर्चा सुरु आहे

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान झाला अशी चर्चा सुरु आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात सात मराठी चेहरे!, शिवसेनाला फक्त एक मंत्रीपद

शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या शरद पवारांना शपथविधीसाठी पाचव्या रांगेचा पास देण्यात आला होता. तर दुसरीकडे राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. शरद पवारांच्या कार्यालयाने यासंबंधी सांगूनही बदल करण्यात आला नाही. यामुळे शरद पवार शपथविधीला गैरहजर राहिले असं सांगण्यात येत आहे. यासंबंधी अद्याप राष्ट्रवादीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

मोदी मंत्रिमंडळात शहा, जयशंकर

‘मोदी सरकार-२’ : एका क्लिकवर मंत्र्यांची यादी

माजी केंद्रीय मंत्री असणारे शरद पवार राजकारणातील एक मोठं नाव असून त्यांना अशाप्रकारे पाचव्या रांगेत स्थान देऊन अपमान करण्यात आला असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे चूक लक्षात आणून दिली असतानाही आसन व्यवस्थेत बदल न करण्यात आल्याने हे जाणुनबुजून केलं का ? असाही प्रश्न विचारला जात आहे.

22
First Published on: May 31, 2019 8:08 am
  • Tags: लोकसभा निवडणूक २०१९,
  • Just Now!
    X