उच्च शिक्षणासाठी मदतीची गरज

वडील रात्रंदिवस तिच्या उज्वल यशासाठी टमटम चालवतात, घरची गरिबी. आई-वडिलांचे शिक्षणही जेमतेम. पण आपल्या वडिलांचे नाव जिद्दीने कॅ नडासारख्या विक सित देशात ज्या मुलीने मोठे केले ती म्हणजे सुषमा. आंतरराष्ट्रीय डिझाईनिंग स्पर्धेत जगात तिसरी आली आहे, ती मूळची कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील. आता तिला हाँगकोँग येथे दोन वर्षे उच्च शिक्षणासाठी जायचं आहे पण हाती पैसा नाही त्यासाठी तिचे वडील याचना करत आहेत.

कॅनडा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धा नुक त्याच पार पडल्या त्यात हजारो स्पर्धक  सहभागी झाले होते. कु मारी सुषमा अंबादास सोनवणे हिने स्पर्धेची तयारी क रून त्यात भाग घेतला आणि चक्क तिचा जगात तिसरा तर  भारत देशात पहिला क्रमांक  आला आहे.  त्याबद्दल तिला एक लाख १७ हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.  सुषमा सोनवणे हिचे  प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती संभाजी विद्यालय कोळपेवाडी येथे चौथीपर्यंत झाले. त्यानंतर पाचवी ते बारावीचे शिक्षण राधाबाई कोळे क न्या विद्यालय को ळपेवाडी कोपरगाव येथे झाले.  गुण चांगले मिळाल्याने तिने यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयात डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये क रिअर करायचं होतं, त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. कोल्हापूरच्या इचलक रंजी येथील दत्ताजी कदम टेक्स्टाईल इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवला.  तेथे ती आता बी टेक  शेवटच्या वर्षांत शिक त आहे. शिक्षण घेत असतानाच तिने डिझाइनिंगच्या असंख्य स्पर्धेत यश मिळवले.  सध्या बेंगलोर येथे प्रशिक्षण सुरू आहे.   कॅ नडा येथे झालेल्या कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धेत तिचा जगात तिसरा क्रमांक आला. त्याच्या जोरावर तिला आता जपानमधील हाँगकोँग येथे दोन वर्षांचा अभ्यासक्रम शिकोयचा आहे.   परदेशात शिक्षण घेणं सोपं नाही, पण तिने आपल्या वडिलांना सांगितलं मला शिकोयचं आहे.   वडील आंबादास रंगनाथ सोनवणे यांचे शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत.  सुरुवातीला ते गोदावरी खोरे दूध संघात १९८१-८२ मध्ये चालक  म्हणून कोम क रत होते.   त्यानंतर ते राज्य परिवहन महामंडळात नाशिक  येथे १२ सप्टेंबर १९८४ रोजी चालक  म्हणून नोक री करू लागले.  पण मुलांच्या शिक्षणात नोक री आड येत असल्याने त्यांनी २० जून १९९४ रोजी एसटी महामंडळाच्या नोक रीचा राजीनामा दिला. त्यात मिळालेली पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी लावली.   त्यांचा मोठा मुलगा संजीवनी इंजिनिअरिंग काँलेजमध्ये शिक ला, तो पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे,  तर दुसरा मुलगा अहमदनगरच्या शासकीय महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे धडे घेत आहे.  मुलगी इचलक रंजी येथे टेक्स्टाईल इंजीनियर होत आहे. वडिलांना इंग्रजीचे सखोल ज्ञान नाही. पण मुलांना शिक वायचं, त्यांना मोठं करायचं ह्य जिद्दीने ते कोळपेवाडी ते शिर्डी या मार्गावर दिवसभर टमटम चालवतात.  त्यातून आलेल्या पैशातून कुटुंबाचा गाडा ओढत मुला—मुलींचे शिक्षण करतात, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना कर्जही कोढावे लागले आहे. एकीक डे साईबाबांच्या दानपेटीत

कोटय़वधीची दान टाक णारे भाविक  आहेत तर दुसरीक डे पोटच्या मुलीला टेक्स्टाईल इंजिनिअर करण्याच्या स्वप्नासाठी टमटमच्या प्रवासातील प्रत्येक  थांब्यावर ठोक र खाऊन मिळेल त्यात आनंद मानून मुलीच्या शिक्षणाची जिद्द पूर्ण क रण्यात आंबादास सोनवणे धन्यता मानत आहेत.