लाल क्षेत्रांमध्ये घरोघरी वृत्तपत्रे वितरणास रविवारपासून परवानगी देण्यात आली आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये वृत्तपत्रे वितरणास परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी मुखपट्टी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मार्च महिन्यामध्ये टाळेबंदी सुरू झाल्यापासून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास बंदी घालण्यात आली होती. बहुतांश वृत्तपत्रांनी सुरुवातीला ई-आवृत्त्या सुरू ठेवत कालांतराने छपाई सुरू केली. मात्र राज्यातील अनेक शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र घरी आणून देणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव केला. अद्यापही काही शहरांमधील गृहनिर्माण संस्थांनी दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना आपल्या संकुलामध्ये येण्यास विरोध कायम ठेवला आहे. वृत्तपत्रांमुळे करोना विषाणूचा संसर्ग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना तसेच सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे रविवारपासून गृहनिर्माणसंस्थांना वृत्तपत्रे घरपोच विक्री करण्याबाबत कोणतेही अडथळे आणता येणार नाहीत.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध