News Flash

गडचिरोलीत एकाच दिवशी आढळले नऊ कोरनाबाधित

चंद्रपुरमध्येही आणखी एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर

प्रतिकात्मक छायाचित्र

गडचिरोली जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात चिरोली गावात एक महिलेला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे गडचिरोलीत एकूण करोनाबाधितांची संख्या २४ तर चंद्रपूरात २२ झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यात आज एकूण ९ करोनाबाधित रुग्ण आढळले. या सर्वांची हिस्ट्री मुंबई येथून थेट गडचिरोली येथे आगमनाची आहे.  त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या ९ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नऊ जणांचा इतरांशी संपर्क आला होता काय? हे सुध्दा बघितले जात आहे.

गडचिरोलीत मुंबई, पुणे, ठाणे येथून आलेले व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची भर पडल्याने, करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता २२ झाली आहे. आहे. २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातीत २६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. चंद्रपूरमध्ये २ मे -( एक रुग्ण ), १३ मे- ( एक रूग्ण) २० मे -( १० रूग्ण ) २३ मे-( ७ रूग्ण ) २४ मे -( २ रूग्ण ) आणि २५ मे -( एक रूग्ण ) अशा प्रकारे  करोनाबाधित २२ रुग्ण आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 7:34 pm

Web Title: nine corona patients were found in one day at gadchiroli msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘सीसीआय’ कापूस खरेदी प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयात
2 दोघांच्या भांडणात जनतेची स्थिती “आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना” – मनसे
3 वर्धेतील व्यक्तीची सिंकदराबादेत करोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद
Just Now!
X