News Flash

साताऱ्यात करोनाग्रस्तांची संख्या ११५

२० जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत

संग्रहित छायाचित्र

कराडमधील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासीताचा  कोव्हिड-१९चा चाचणी अहवाल आज शुक्रवारी सकरात्मक आला. हा नवा रुग्ण कराडनजीकच्या मलकापूर येथील असून, आजवर कराड तालुक्यात ८६, तर सातारा जिल्ह्यातील ११५ करोनाग्रस्त निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात आज २४४ जणांचे कोव्हिड चाचणी अहवाल नकारात्मक आले. तर, १३४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वाच्या घशाच्या स्त्रावांची चाचणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात करोनाबाधित म्हणून ९३ जण उपचार घेत आहेत. तर, २० जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, करोनाबाधित दोघांचा मृत्यू झालेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:08 am

Web Title: number of corona victims in satara is 115 abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : नांदेडमध्ये पुन्हा तीन करोना रुग्ण सापडले
2 Coronavirus: करोनाच्या काळातही मजुरांसाठी दिवसभर आरोग्य सेवा देणारा डॉक्टर
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले ठळक मुद्दे
Just Now!
X