News Flash

रेल्वेतील शौचालयात पाय अडकलेल्या वृद्ध महिलेस सहीसलामत बाहेर काढण्यात यश

ही महिला ठाण्याहून करमाळी गोवा असा प्रवास करत होती.

रत्नागिरी स्थानकावर कोकणकन्या एक्स्प्रेमधील शौचालयामध्ये महिलेचा पाय अडकल्याची घटना आज घडली.

रत्नागिरी स्थानकावर कोकणकन्या एक्स्प्रेमधील शौचालयामध्ये महिलेचा पाय अडकल्याची घटना आज घडली होती.  त्यानंतर, ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेचा पाय सुखरुप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. राबीया शेख (६८) असे शौचालयात पाय अडकलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला ठाण्याहून करमाळी गोवा असा प्रवास करत होती.
konkankanya01
राबीया या प्रवासादरम्यान रात्रीच्या सुमारास रेल्वेच्या शौचालयात गेल्या त्यावेळी त्यांचा पाय त्यात अडकला. त्यानंतर महिलेचा पाय सुखरूप सोडवण्यासाठी डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला होता. मात्र शौचालयाचे होल आणि पायाचे माप सारखेच असल्याने पाय काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर, ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेच्या पायास कोणतीही इजा होऊ न देता सुखरुप सुटका करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 12:25 pm

Web Title: old womans leg stuck in kokankanya express toilet
Next Stories
1 विधानसभेत कचरा न करण्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी
2 शिवसेनेचाही बाजीराव-मस्तानी चित्रपटाला आक्षेप
3 अधिवेशनातून, खान्देशी वांग्याचे भरीत अन् कळणाची भाकरी
Just Now!
X