वाढत्या प्रदुषणामुळे करोना वाढण्याचा धोका असून, त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. राज्यातही सरकारनं सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मज्जाव करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, पुणे व ठाणे या दोन शहरांमध्येच पर्यावरणस्नेही ( Green crackers) फटाके फोडण्यास आजच्या आदेशाने परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने दिवाळी सणात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. असा आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

तर, मुंबई महापालिकेनं फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं दिवाळीसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे. १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सोसायटीचे अंगण/घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरुपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी/ झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यायची आहे, असे सांगण्यात आले आहे.