02 March 2021

News Flash

शेतकऱ्यांच्या राशीला पाऊस, कीड

डहाणू तालुक्यात पावसानंतर हळव्या भातावर ‘राशी पवित्रा’ किडीचा प्रादुर्भाव

करोना संसर्ग टाळण्यासाठी लादलेल्या टाळेबंदीत मनुष्यबळाची जमवाजमव करून भातरोपांची लागवड. जुलै ते ऑगस्ट महिन्यांत झालेल्या पुरेशा पावसामुळे चांगले भात येण्याची आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना ऑक्टोबरच्या मध्यावधीस परतीच्या पावसाने दिलेला तडाखा आणि आता ‘राशी पवित्रा’ या हळव्या जातीच्या भातपिकाला उशिरा आलेल्या फुलोऱ्याला किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पावसाने नेलेले भात आता कीड खाणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

गरव्या जातीचे बियाणे समजून ‘राशी पवित्रा’ या हळव्या जातीच्या बियाणांची लागवड करण्यात आली होती. भातपिकाला उशिरा आलेला फुलोऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डहाणूतील वेती भागातील शेतकऱ्यांसमोर दुसरे नवे संकट उभे ठाकले आहे.

त्यामुळे पिकाला फुलोरा आला, पण दाणे भरले नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर डहाणू तालुका तक्रार निवारण समिती डहाणूने मौजे वेती  येथील गावात राशी पवित्रा बियाणे लागवड केलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

डहाणू तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भातशेतीवर अवलंबून आहे. यासाठी गरव्या जातीच्या बियाणाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. दरम्यान गरव्या बियाणे संपल्याने कासा येथील कृषी केंद्रातून हळव्या जातीचे ‘राशी पवित्रा’ बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. गरव्या जातीच्या पिकापेक्षा हळव्या जातीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे मत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. टी. एस. ढाणे यांनी मांडले.

डहाणूतील मौजे वेती भागात १२ हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीतील भाताला फुलोरा आला. पण दाणेच न भरल्याने पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची  मागणी आहे. शेतकऱ्यांनी बियाणेबाबत कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर कासाचे कृषी पर्यवेक्षक  संदीप संखे यांनी प्रत्यक्ष तक्रारदारांसोबत शेतीची पाहणी करून वरिष्ठांना अभिप्राय दिला. त्यानंतर गुरुवारी डहाणू तालुका तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारीची पाहणी केली.

या वेळी तालुका कृषी अधिकारी संतोष पवार, कोसबाड कृषी विज्ञान  केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाने, मानव अधिकार मिशनचे श्यामसुंदर चौधरी, मैनुद्दीन खान व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:13 am

Web Title: outbreak of rashi pavitra insect on soft paddy after rains in dahanu taluka abn 97
Next Stories
1 मराठा आरक्षणावर घटनापीठासमोर सुनावणी व्हावी हीच सरकारची भूमिका-अशोक चव्हाण
2 महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ८९ टक्के, दिवसभरात ९ हजार ९०५ रुग्ण करोनामुक्त
3 “नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”
Just Now!
X