भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्याचं झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली १० हजार कोटीची मदत पुरेशी नाही. त्यामुळे सरकारनं आणखी मदत करावी,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सावरगावातील मेळाव्यात केली.

दसऱ्यानिमित्त सावरगावातील भगवान गडावर मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली असून, आज पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केलं. “विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केलं. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई. एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत,” अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली.

minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
Action started against village gangsters before loksabha election in nagpur
आली रे आली, आता… गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा; दीड हजारावर गुन्हेगारांवर…
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

“खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. अपप्रचार सुरू होता. पण, करोना काय मी आणला का? करोनात जबाबदारीनं वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. जिवंत असेपर्यंत भगवान गडावर येत राहिन,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

अतिवृष्टीमुळं शेतकरी बेजार झाला आहे. मी सरकारकडे मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली. सरकारनं १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण, ती पुरेशी नाही. शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे. त्यामुळे सरकारनं आणखी मदत जाहीर करावी,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.