30 March 2020

News Flash

अतिक्रमण काढण्यावरूनही हिंगोलीत नेत्यांचे राजकारण!

शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते काढण्याची सर्वत्र ओरड होत असताना कळमनुरीतील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हातोडा घातला.

| May 1, 2015 01:30 am

शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते काढण्याची सर्वत्र ओरड होत असताना कळमनुरीतील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हातोडा घातला. मात्र, िहगोली, सेनगाव, औंढा येथील अतिक्रमणांकडे कानाडोळा होत असल्याने यात सत्ताधारी-विरोधक असे राजकारण होत असल्याच्या चच्रेला उधाण आले आहे.
वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव, िहगोली शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात झालेले अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. दोन महिन्यांपूर्वी वसमत येथील महामार्गावर गोमटी ते शासकीय विश्रामगृह या भागातील अतिक्रमणांवर हातोडा पडला न पडला तोच परत या रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी ठाण मांडले आणि अतिक्रमणांचा मुद्दा परत जैसे थे झाला. कळमनुरीतही हीच अवस्था होती. शहरात प्रवेश करताना वाहनचालकांना अतिक्रमणांचा मोठय़ा प्रमाणात त्रास होत असे. वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघात होऊन दोन-तीनजणांचा मृत्यू झाला. सेनगाव येथील अतिक्रमण काढण्यासाठी जि. प. सदस्य द्वारकादास सारडा यांनी अनेकदा लक्ष वेधले. मात्र, त्याची दखल घेतली नाही. औंढा नागनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे बसस्थानकासमोर झालेल्या अतिक्रमणांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अतिक्रमण काढण्याची मागणी वारंवार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आदेश देऊनही अजूनही जैसे थे स्थिती आहे.
िहगोलीतही नांदेड, अकोला महामार्गावर रिसाला बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रहदारीला अडथळे निर्माण होतात. वास्तविक, या मुख्य रस्त्यावर आदर्श महाविद्यालय, माणिकस्मारक, सरजूदेवी विद्यालय अशी नामांकित विद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची रस्त्यावरून ये-जा मोठय़ा प्रमाणात होत असते. यापूर्वी आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा, बसस्थानकासमोर एका नागरिकाचा व जिल्हा कृषी कार्यालयासमोर एका विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले, मोच्रे काढले. गेल्या वर्षी िहगोली शहराच्या बसस्थानक व देवडानगर परिसरातील अतिक्रमण काढून रस्त्याचा श्वास मोकळा केला होता. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे या रस्त्यावर परत अतिक्रमणे झाल्याने या रस्त्यावरून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच जावे लागते.
अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दोन आठवडय़ांपूर्वी बठक घेऊन सार्वजनिक बांधकाम, पालिका व पोलीस विभागाला सूचना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून कळमनुरी शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणांवर बुधवारी बांधकाम विभागाने हातोडा चालविला. या साठी पोलीस बळ, महसूल व पालिका प्रशासनाची मदत घेतली आणि संपूर्ण रस्ता मोकळा करून दिल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2015 1:30 am

Web Title: politics in hingoli on move to trespassing
टॅग Hingoli,Politics
Next Stories
1 पन्नास हजार रुपये लाचप्रकरणी मुख्याध्यापकासह दोघांवर गुन्हा
2 दुष्काळातील पाण्याच्या टाक्या पुढाऱ्यांच्या घरी!
3 मनसे नगरसेविकेने महासभेत चप्पल उगारली
Just Now!
X