News Flash

पुणे : पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट; ५४ जणांवर गुन्हा दाखल

भाजपाच्या पदाधिकाऱ्याने केली होती तक्रार

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पुणे शहर पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांविरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाच्या युवा संघटनेचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी याप्रकरणी १० मे रोजी पुणे शहर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

“भाजपाचे पदाधिकारी विनीत बाजपेयी यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आम्ही ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,” असे सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याची तक्रार भाजपाच्या विनीत बाजपेयी यांनी केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान,  त्याआधी ४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांविषयी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कथित बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:51 pm

Web Title: pune 54 more booked for objectionable posts against pm modi fadnavis abn 97
Next Stories
1 हे काय वित्त नियोजन आहे का?; जयंत पाटलांचा निर्मला सीतारामन यांना सवाल
2 “ राज्यातील माध्यमांमधील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा!”
3 “अग्रलेखांचा बादशाह माहिती होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले”
Just Now!
X