विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी संपली. जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत यंदा बहुरंगी लढत अपेक्षित आहे. मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा घेतलेला थोडक्यात आढावा.
अलिबाग विधानसभा मतदारसंघ
अलिबाग तालुका, मुरुड तालुका आणि रोहा तालुक्यातील चणेरा जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. या वेळी या मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मधुकर ठाकूर, राष्ट्रवादीकडून अलिबाग शहर अध्यक्ष महेश मोहिते, शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी, शेतकरी कामगार पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य सुभाष प्रभाकर पाटील आणि भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश काठे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पार्टी, बसपा यांच्यासह मोठय़ा प्रमाणात अपक्ष उमेदवार निवडणूक िरगणात असणार आहेत.
पेण विधानसभा मतदारसंघ  
 पेण तालुका, सुधागड पाली तालुका आणि रोहा तालुक्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. या ठिकाणीदेखील बहुरंगी लढत होणे अपेक्षित असणार आहे. मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मंत्री रवींद्र पाटील, शेकापकडून आमदार धर्यशील पाटील, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे, शिवसेनेकडून उप जिल्हाप्रमुख किशोर जैन, मनसेकडून जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, भाजपकडून सतीश चंदने आणि राम घरत यांच्यासह १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महाड विधानसभा मतदारसंघ
महाड तालुका पोलादपूर तालुका आणि माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून तयार झालेल्या या मतदारसंघातही बहुरंगी लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून कोकण म्हाडाचे अध्यक्ष माणिक जगताप, शिवसेनेकडून भरत गोगावले, राष्ट्रवादीकडून उदय अंबुणकर, भाजपकडून सुधीर महाडिक, बसपाकडून प्रणय सावंत, मनसेकडून सुरेंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शेकापचा उमेदवार निवडणूक िरगणात असणार नाही.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ
श्रीवर्धन तालुका, म्हसळा तालुका, तळा तालुका, माणगाव तालुक्यातील काही भाग आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघातही बहुरंगी लढत अपेक्षित असणार आहे. मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अवधूत तटकरे, शिवसेनेकडून सुनील सितप, उपजिल्हाप्रमुख रवी मुडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव पवार यांनी, काँग्रेसकडून पत्रकार उदय कठे, शेकाप अस्लम राऊत, भाजपकडून मनोज पाकडे, पांडुरंग चौले, शिवसेना संपर्कप्रमुख कृष्णा कोबनाक यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून गोंधळ कायम आहे.
कर्जत विधानसभा मतदारसंघ
कर्जत आणि खालापूर तालुके मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. या ठिकाणीही या वेळी बहुरंगी लढत अपेक्षित आहे. मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार सुरेश लाड, शिवसेनेकडून हनुमंत िपगळे, मनसेकडून जे पी पाटील, शेकापकडून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख महेंद्र थोरवे, काँग्रेस शिवाजी खारीक, भाजपचे अँड राजेंद्र येरुणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. िपगळे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजीचा सुरू आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघ
पनवेल शहर, पनवेल तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. रायगडातील कॉस्मो पॉलिटियन मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून भाजपकडून काँग्रेसचे माजी आमदार प्रशांत ठाकूर, शेकापकडून जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, बसपाकडून बाळाराम पाटील, काँग्रेसकडून आर सी घरत, शिवसेना वासुदेव घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील घरत निवडणूक िरगणात असणार आहेत. त्यामुळे इथेही बहुरंगी लढत अपेक्षित असणार आहे.
उरण विधासभा मतदारसंघ
उरण तालुका, पनवेल तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघातून शेकापचे विवेक पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, शिवसेनेचे मनोहर भोईर, बसपाचे मल्लिक असगर मकसूद निवडणूक िरगणात असणार आहे.

Nagpur, BJP MLA sister, deprived of voting,
नागपूर : भाजप आमदाराच्या भगिनीचेच नाव मतदार यादीतून वगळले
The dispute for two seats in the Grand Alliance is still ongoing
महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया
Nilesh Sambare Vanchit Bahujan Aghadi candidate in Bhiwandi Lok Sabha constituencies in Thane district
भिवंडीत तिरंगी लढत; निलेश सांबरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक