रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २५० वर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे उरण एकाच कुटूंबातील २१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर पनवेल मनपा हद्दीत १३, पनवेल ग्रामिण हद्दीत एक तर महाडमध्ये एक नवा रुग्ण आढळून आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २४ तास २३ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील १,४३५ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १,१५८ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २५० जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर २७ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ९१ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १४९ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ८०, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३७, उरणमधील २५, श्रीवर्धनमधील १, कर्जतमधील १ तर अलिबागमधील ३ तर महाडमधील दोन रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात करोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.