गेले अडीच महिने पावसाने घोर निराशा केल्यानंतर अलिकडे सोलापुरात उन्हाळ्याप्रमाणे उकाडा वाढू लागल्याने सारे जण त्रस्त असतानाच बुधवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात तापमान वाढून ३७ अंश सेल्सियसच्या घरात गेले आहे. त्यामुळे नागरिक उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. रात्री हवामान कोरडे राहिले आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहराप्रमाणेच उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी भागातही पावसाने हजेरी लावली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 3:40 am