मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात असा टोमणा राज ठाकरेंनी मारला आहे. राज ठाकरे यांनी नाशकात मनसे वीज कामगार संघटनेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधाऱ्यांना काही घेणं देणं नाही,असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मोदी आणि शाह यांनी उठ म्हटलं की मुख्यमंत्री उठतात, बस म्हटलं की बसतात असा टोलाही राज यांनी हाणला. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांपासून महाराष्ट्राला मुक्त करा असे नरेंद्र मोदी सांगायचे. आता तेच मोदी शऱद पवारांसोबत बसतात, त्यांचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधत ठाकरेंनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेतला होता त्यावेळी आमच्यावर टीका झाली अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2015 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्री फडणवीस हे मोदींच्या डोक्याने चालतात- राज ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात असा टोमणा राज ठाकरेंनी मारला आहे.
First published on: 01-03-2015 at 05:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray attcked on cm devendra phadanvis in nashik