News Flash

मोर्चा काढलाय वाघांनी; भिडे गुरुजी समर्थकांचं सांगलीत शक्तीप्रदर्शन

भिडे गुरुजींवर खोटे आरोप करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे.

सांगलीत पुष्पराज चौकापासून मोर्चाला प्रारंभ झाला.

संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ सांगलीत गुरुवर्य सन्मान महामोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात २० हजार समर्थक सहभागी झाले. या मोर्चात सहभागी झालेल्यांना एक पत्रकच देण्यात आले असून मोर्चात कोणत्या घोषणा द्यायच्या, याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.

सांगलीसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पणजीमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ आज  (बुधवारी) सकाळी १० वाजता मोर्चे काढण्यात आले. सांगलीत पुष्पराज चौकापासून मोर्चाला प्रारंभ झाला असून राममंदिर, काँग्रेस भवनमार्गे स्टेशन चौकात मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात सुमारे २० हजार समर्थक सहभागी झाल्याचे सांगितले जाते.

मोर्चात सहभागी झालेल्यांना घोषणा कोणत्या द्यायच्या याचे एक पत्रकच देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चामध्ये या व्यतिरिक्त कोणत्याही घोषणांचा वापर नको, असे यात म्हटले आहे.

मोर्चातील घोषणा
> भिडे गुरुजींना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे
> नही चलेगी नही चलेगी- दडपशाही नही चलेगी
> देशभक्त गुरुजींच्या अटकेची मागणी करणाऱ्यांचा निषेध असो.
> बघतोय काय रागानी, मोर्चा काढलाय वाघांनी
> भिडे गुरुजींवर खोटे आरोप करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे.
> पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय
> धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज की जय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:41 pm

Web Title: rally in support of sambhaji bhide in sangli slogans list for shiv pratishthan hindustan
Next Stories
1 ‘एल्गार परिषद भरवणारेच खरे गुन्हेगार’
2 विद्यार्थी ‘तावडे’तून सुटले ! 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा ‘विनोद’ मागे
3 संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सांगली, पुण्यात मोर्चा
Just Now!
X